पन्हाळा : ग्रामीण भागांमध्ये ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी पन्हाळा तालुक्यातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन 'एक घर-एक पुस्तक'अभियान सुरू केले . या तरुणांनी प्रत्येक घरापाठीमागे एक पुस्तक जमा करण्याचा ध्यास घेतला . त्यातून काही आठवड्यात 2132 पुस्तके जमा झालीत .यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्य ,दलित साहित्य व समिक्षा ,कथा -कादंबरी ,काव्य ,बालसाहित्य आणि महानुभव संप्रदायावरील दुर्मिळ पुस्तके ,हस्तलिखिते ,मासिके अशी विपुल साहित्यसंपदा जमा झाली . डॉ . दीपक चव्हाण , उमाताई पानसरे ,अमोलदादा मिठकरी यांनी पुस्तके देऊन या अभियानास शुभेच्छा दिल्या . या अभियानातून छ. राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय , पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी),माजी सहाय्यक फौजदार श्री . कल्लापा चव्हाण महानुभव आणि संत वाङमय दालन , ऐतिहासिक संदर्भसाधन ग्रंथालय आदी ग्रंथालयांची उभारणी केली जाणार आहे .याव्यतिरिक्त पन्हाळा आणि पन्हाळा परिसरामध्ये आणखी काही ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा मानस आहे अशी माहिती 'एक घर -एक पुस्तक'या अभियानाचे समन्वयक शिवप्रसाद शेवाळे यांनी दिली . या अभियानात अमोल पांढरे ,दक्षता तेलंगे ,स्वप्नील पाटील ,राजू शेख ,अक्षय सावंत ,राहूल पाटील ,अनिकेत पाटील आदी कार्यकर्ते सहभागी असून त्यांनी पुस्तके आणि फर्निचरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले .
No comments:
Post a Comment