कोल्हापूर :प्रतिनिधी दि. ७/३/१८
मिलींद बारवडे
शिक्षण हक्क कायद्याची शासनाकडून उल्लंघनसुरू आहे .त्यामुळे राज्याचे शिक्षण संकटात आहे .शिक्षण विभागाच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे राज्यातले अनेक विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत .अशैक्षणिक ऑनलाइन कामाच्या प्रचंड ताणामुळे शिक्षक वैतागले आहेत .शिक्षण विभागाच्या अशास्त्रीय प्रयोगामुळे अभ्यासक शिक्षणतज्ञ काळजीत आहेत. सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक विरोधी धोरणामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परिस्थितीचा वाईट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्यामुळे पूर्वप्राथमिक महाविद्यालयीन ८५ शिक्षक संघटनांनी समन्वयक शिवाजी खांडेकर, संभाजी थोरात, मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले व शासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत ,शाळांत शिक्षक भरती करावी ,माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंद रद्द करावा ,पात्र शाळांना अनुदान दयावे ,शालेय पोषण आहार कामे कमी करावीत , अशैक्षणिक कामे बंद करावीत , शिक्षणासाठी लोकसहभागाची शक्ती करू नये , शिक्षण हक्क कायद्याची कक्षा वाढवावी ,वीजबिल शिक्षणाचे कंपनीकरण करू नये , प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुलभ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या धरणे आंदोलनाला आम.डॉ.सुजित मिणचेकर व आम. शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व पाठींबा दर्शविला. या धरणे आंदोलनात आम. श्रीकांत देशपांडे,आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील , आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ.सुधिर तांबे, आमदार कपिल पाटील सहभागी होते. शिक्षक नेते मोहन भोसले, राजाराम वरूटे, सुधाकर निर्मळे , भास्कर चंदनशिवे,मिलिंद बारवडे, फुलसिंग जाधव , भरत रसाळे,रविकुमार पाटील ,जयवंत पाटील, सुनिल पाटील, शिवाजी ठोंबरे, प्रकाश एडगे, प्रकाश सोनी आदीसह राज्यातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .
फोटो
मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन मध्ये बोलतांना जेष्ठ शिक्षक नेते संभाजी थोरात शेजारी समन्वयक शिवाजी खांडेकर व राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार आणि ८५ संघटनांचे प्रमूख पदाधिकारी (छाया : मिलिंद बारवडे )
No comments:
Post a Comment