Wednesday, 7 March 2018

महिलांनी सक्षम होऊन स्वतःची व देशाची प्रगती करावी ": गीतांजली ठोमके यांचे प्रतिपादन


कोल्हापूर - प्रतिनिधी ज्ञानराज पाटील

कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा. राजर्षी विद्यामंदिर क्र.११ च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध महिला सक्षमीकरण विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते.त्याअंतर्गत महिलांसाठी संगीतखुर्ची, मेहंदीस्पर्धा,पाककला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी प्रबोधनपर
व्याख्यान यांचा समावेश होता.

सदर उपक्रमाचे उदघाटन मिसेस महाराष्ट्र २०१७ च्या गोल्डन क्राउन  विजेत्या व योगशिक्षिका मा.सौ.गीतांजली ठोमके मॅडम यांच्या हस्ते करणेत आले.यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,उपाध्यक्षा पल्लवी पाटील व सदस्य,सामाजिक कार्यकर्त्या शिला दाभाडे, जेष्ठ शिक्षक सुशील जाधव,उत्तम कुंभार,आसमा तांबोळी मॅडम,सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे व इतर शिक्षक महिला पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.

या वेळी गीतांजली ठोमके मॅडम यांनी महिलांचे आरोग्य,मुलींचे शिक्षण याबाबत व्याख्यान देऊन " मुलींनी कर्तृत्ववान होऊन समाजाची सेवा करावी" असा संदेश दिला. तर मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी " महिलांवर कुटुंबाबरोबरच या देशाचीही जबाबदारी आहे.महिला शिकल्या सवरल्या व विकसित झाल्या तरच हा देश विकसित होईल.मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण,देशाचे रक्षण ह्या घोषणेचा जयघोष करून प्रगतीचा मूलमंत्र दिला."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले,आभार प्राजक्ता कुलकर्णी मॅडम यांनी मानले.

No comments:

Post a Comment