Thursday, 8 March 2018

जागतिक महिला दिनानिमित्त शाहुपुरी पोलीस स्टेशन येथे महिला मेळावा

कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार

        जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरण कोल्हापूर कार्यालयातील महिलांनी आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचे शाहुपुरी पोलीस स्टेशन तर्फे स्वागत करून त्यांचेकरिता पोलीस स्टेशन आवारात थंडपेयपानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
     आज शाहूपुरी पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी पाहत असून सपोनि तृप्ती देशमुख मॅडम व सर्व महिला कर्मचाऱयांनी रॅलीत सहभागी महिलांशी संवाद साधून त्यांना पोलीस विभागाबाबत माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
      जागतिक महिला दिना निमित्त शाहुपुरी पोलीस स्टेशन येथे महीला मेळावा, आरोग्य शिबीर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

No comments:

Post a Comment