Tuesday, 10 April 2018

निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची स्वाभिमानी संघटनेची मागणी  




      कोल्हापूर / प्रतिनिधी दि. १०/४/१८
        मिलींद बारवडे 

कोल्हापूर जिल्ह्यातील चोवीस वर्ष सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या व निवड श्रेणीस पात्र असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे निवड श्रेणी प्रशिक्षण शिक्षण विभागाने यासाली तात्काळ आयोजित करावे अशी  मागणी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने  संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी लेखी निवेदन प्रभारी उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे यांना देऊन केली आहे.

     कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांचे चोविस वर्ष पूर्ण झालेल्या व पदवीत्तर अहर्ता प्राप्त करणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून  ज्यांचे चोविस वर्ष पूर्ण झाले त्यांचे  दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. ते प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या  शिक्षकांना ज्या त्या शाळांचे संस्थाचालक संस्था पातळीवर त्या शिक्षकांना चोविस वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केला असून निवड श्रेणीस पात्र म्हणून ठराव दिला जातो. शाळेच्या पातळीवर प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवून मान्यता घेतली जाते. त्यांना मुख्याध्यापक स्केल सुरू होतो.

        
   मात्र शिक्षण विभागाकडून गेली दोन वर्षे  निवड श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नाही. यामुळे या श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची गैरसोय झाली आहे. प्रशिक्षण न झालेमुळे संस्था पातळीवर संबधीत शिक्षकांचे नावे निवड श्रेणीसाठी पात्र म्हणून ठराव देता येत नाही. काही शिक्षकांचे पंचवीस ते अठ्ठावीस वर्षे पूर्ण होऊनही त्यांचे प्रशिक्षण न झालेने त्यांना निवड श्रेणीच्या लाभापासून अनेक शिक्षकांना वंचीत राहावे लागत आहे. 

     या श्रेणीमुळे मुख्याध्यापक व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांचा पगार समतूल्य होतो. मुख्याध्यापक पद न मिळाले तरीही निवडश्रेणी प्राप्त शिक्षकांना  तो स्केल मिळतो. म्हणून पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मिळणे अत्यावश्यक आहे.तरी शिक्षण विभागाने निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करून पात्र शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे. लेखी निवेदन दिले आहे ते राज्य शासनाच्या  शिक्षण विभागाच्या बोर्ड विभाग  ,उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर, शिक्षण आयुक्त पुणे , शिक्षण सचिव मुंबई विभागाकडे तात्काळ पाठवून पाठपूरावा व्हावा असे लेखी निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हाध्यक्ष प्रविण देसाई, संघटक फुलसिंग जाधव, खजानिस नंदकुमार कांबळे, शहराध्यक्ष अॅन्थनी गोन्सावलीस, सल्लागार उध्दव पाटील,रुजाय गोन्सावलीस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        फोटो 

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे यांना लेखी निवेदन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे देत असतांना. शेजारी स्वीय सहाय्यक सुधिर कुंभार  अन्य पदाधिकारी

No comments:

Post a Comment