Sunday, 8 April 2018

प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी दि. ८/४/१८


      सुगम व दुर्गम बदल्यांचा प्रश्न व्यवस्थित सुटण्यासाठी चांगली भूमिका चांगले विचार व योग्य ध्येय सर्वांचे एकच असेल तर शिक्षक वर्गाचे निश्चितच भले होईल.सर्वांनी प्रत्येकाच्या मनाचा विचार केल्यास आत्मयिता निर्माण होऊन नाते दृढ होईल. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले यांनी केले.

     ते प्राथमिक शिक्षक बँकेत समन्वय समितीची शिक्षकांच्या बदली संदर्भात विचारमंथन सभा आयोजित केली होती त्या प्रसंगी बोलत होते. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील, सचिव सुरेश कोळी, मार्गदर्शक राजाराम वरुटे, मार्गदर्शक प्रसाद पाटील व संघटना पदाधिकारी यांच्या सुसंवादातून सुगम व दुर्गम जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात पुढीलप्रमाणे चर्चा झाली. खालील मुद्यांच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

   बदली पोर्टल भरताना समन्वय समितीच्या वतीने विनम्र आवाहन खो पध्दतीला समर्थन असा गैरसमज करून घेऊ नये.दुर्गम बांधवांवर अन्याय न होता २७/२ च्या जी आर मध्ये सुधारणा व्हावी यासाठी समन्वय समितीचा पाठपुरावा शेवट पर्यंत सुरू रहाणार आहेच.तरीही बदली पोर्टल सुरू झाल्याने खालील काही गोष्टी विचारात घेतल्यास कमीत कमी बदल्या होवून कमीत कमी अन्यायकारक बदल्या होतील.

        सोयीत असताना अधिक सोयीत येण्यासाठी संवर्ग १ मधील शिक्षक बंधू भगिनींनी विनंती फॉर्म भरू नये.त्यांनी बदली नको हा पर्याय निवडावा.


खरोखर जे ३५-४० किमी पेक्षा दूर आहेत त्यांनी बदली हवी पर्याय निवडावा इतरांनी निवडू नये ही विनंती आणि २० शाळा निवडताना ही जास्तीत जास्त रिक्त असलेल्या सोयीच्या शाळा निवडाव्यात. म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील.आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.

     संवर्ग २ मधील शिक्षकांनीही २० शाळा निवडताना आपल्या सोयीच्या जास्तीत जास्त रिक्त असलेल्या शाळा निवडाव्यात म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील.आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.

   सोयीत असणाऱ्या संवर्ग ३ मधील शिक्षकांनी बदली मागू नये. गैरसोयीतील शिक्षकांनीही २० शाळा निवडताना ही आपल्या सोयीच्या जास्तीत जास्त रिक्त असलेल्या शाळा निवडाव्यात.म्हणजे कमी खो बसतील आणि बदल्या कमी होतील. आपल्याच बांधवांवर होणारा अन्याय टळेल.


     मागील वर्षीचा अनुभव पाहता बदली मागणारे दुर्गम बांधव फक्त ३४ होते. पण सोयीत असतानाही संवर्ग १ मधील बदली मागण्याची संख्या जास्त झाल्याने बदली संख्या वाढली होती. तेंव्हा विनाकारण जास्त बदल्या होवू नयेत याची सर्वांनीच दक्षता घेण्याचे समन्वय समितीच्या बैठकीत ठरले आहे.

     २७/२ च्या बदली धोरणांत सुधारणा बाबत आज समन्वय समिती सर्व सदस्य व दुर्गम बांधव प्रतिनिधी यांच्यात प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली.ही चर्चा पुढे चालू ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही असे सर्व समावेशक धोरण तयार करून शासनास सुचवावे यासाठी पुन्हा मंगळवारी सर्व संघटना प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.

     या प्रसंगी समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील, सचिव सुरेश  कोळी, मार्गदर्शक राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, मार्गदर्शक राजाध्यक्ष प्रसाद पाटील, कृष्णात कारंडे, सुधाकर निर्मळे विविध प्राथमिक शिक्षक  संघटनांचे  जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे, जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, जिल्हाध्यक्ष रघुनाथ खोत, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबरे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंदकर, जिल्हाध्यक्ष तानाजी घरपणकर, जिल्हाध्यक्ष गुरुराज हिरेमठ, जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, पी.ए. पाटील, सतिश बरगे, हरिदास वर्णे, आनंदा जाधव, प्रकाश ऐडगे, नागेश शिणगारे, ए.के. पाटील, प्रकाश सरदेसाई, मारूती पाटील, सदाशिव कांबळे, शिवाजी रोडे पाटील, किरण शिंदे, सदानंद शिंदे, प्रभाकर कमळकर, कृष्णात भोसले, सर्जेराव सुतार, विकास चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        फोटो - प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत शिक्षक नेते मोहन भोसले बोलतांना शेजारी रविकुमार पाटील, सुरेश कोळी, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील.

No comments:

Post a Comment