आज शिवजयंती त्या निमित्ताने हे दोन शब्द !
कोल्हापूर - ज्ञानराज पाटील.
शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केलीच पाहिजे यात दुमत नाही पण वर्गणी काढून आणि डॉल्बीवर नाचण्यापेक्षा घराघरांत आणि मनामनात शिवजयंती साजरी झाली पाहिजे.
शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर असताना कोणतेही कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही,त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो.
अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून,आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती,भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही.
जिजाऊ मा साहेबांच्या, छ. शिवरायांच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.
No comments:
Post a Comment