हेरले / प्रतिनिधी दि. १६/४/१८
सलीम खतीब
किल्ले विशाळगड तालुका शाहूवाडी येतील बेकायदेशीर बांधकामे तात्काळ काढणेबाबत व परप्रांतीय रहिवाशांचे स्थानिक रहिवाशांना वारंवार होत असलेल्या मारहाणीबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा असे लेखी निवेदन मुख्य वनसंरक्षक अधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. अन्यथा मनसे स्टाईलने रविवार दि. २२ एप्रिल रोजी अतिक्रमण काढण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांनी पत्रकार परिषेद्वारे दिली.
निवेदनाचा आशय असा की छत्रपती शिवरायांना जीवदान देणारा व वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जिंकलेला शाहुवाडी तालुक्यातील एकमेव असा इतिहासाचा साक्षीदार असणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर किल्ले विशाळगड अतिक्रमणाच्या व बेकायदेशीर कृत्यांच्या विळख्यात आहे .सध्या विशाळगडावर दारूबंदी असताना राजरोसपणे दारू ,गांजा ,चरस ,गुटखा इत्यादींची विक्री होत आहे .कायद्याचे उल्लंघन करून कुठल्याही ऑफिसची परवानगी न घेता आर सी सी तीन ते चार मजली बेकायदेशीर घरे बांधली जात आहेत. परप्रांतीय लोकांची बोगस रेशनकार्ड तयार केली जात आहेत. यासाठी आर्थिकतेच्या मोठ्या वाटाघाटी केल्या जातात. याबाबत वारंवार सूचना देऊन सुध्दा पुरातत्व खात्याचे विशाळगड कडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी वनविभागाच्या जमिनीत येथील स्थानिक व परप्रांतीय लोकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे पर्यटना कडून भाडे वसुल केली जात आहे .तसेच विशाळगड एस टी स्टँड येथे स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करून भाडे वसुली चालू केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गड असताना त्यांच्या परप्रांतीय लोकांकडून छत्रपती शिवरायांच्या पोस्टरवर डांबर फेकले जात.भगवे ध्वज लावून विशाळगडावर येणाऱ्या लोकांना मारहाण केली जाते. ऐतिहासिक वस्तू जाणीवपूर्वक नष्ट केल्या जात आहेत. वाघजाई देवीची मूर्ती वारंवार उखडून फेकून दिली जाते .गडाच्या पायथ्याला वनखात्याच्या जागेवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे .परप्रांतीय लोक स्थानिक रहिवाशांना व येणाऱ्या पर्यटकांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत .असंख्य मारहाण झालेल्या लोकांनी भीतीपोटी तक्रारी शाहुवाडी पोलिसांना दिलेल्या नाहीत .सध्या विशाळगड परिसरातील लोकांचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे असे झाले नाही. तर मोठी घटना घडून किल्ले विशाळगडावर पर्यटक येण्याचे बंद होतील व ऐतिहासिक साक्षीदार किल्ले विशाळगड काळाच्या ओघात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही .
तरी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे काढावीत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवार दिनांक 22 एप्रिल 2018 रोजी मनसे स्टाईलने अतिक्रमण काढण्यात येईल व होणार्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल . निवेदनाच्या माहिती प्रती तहसिलदार शाहूवाडी, पंचायत समिती शाहूवाडी, पोलीस ठाणे शाहूवाडी, ग्रामपंचायत गजापूर विशाळगड आदींना पाठविल्या आहेत.
कृष्णात दिंडे शाहुवाडी तालुका अध्यक्ष , फरजाना मुल्ला कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा ,आनंद विंगकर तालुका उपाध्यक्ष कृष्णात पाटील तालुका उपाध्यक्ष,संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष ,सतीश तेली बांबवडे शहर अध्यक्ष ,विजय परीट शहर उपाध्यक्ष बांबवडे, महादेव मुल्ला माजी शहराध्यक्ष बांबवडे ,सतीश तांदळे माजी तालुका उपाध्यक्ष मिराज नायकवडी ,सुनील सुतार, विभागीय अध्यक्ष ,मंगेश घोडके ,विजय निकम, दिनकर जाधव ,विजय माळी, विकास महाडिक आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment