फेसबुक पेज ला लाईक करा व बातम्या मिळवा फेसबुकवर.
आरबीआयने भारतातील कुठल्याही बँकेच्या खात्यातून बिटकाॅइनसहित सर्वच क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. अशाप्रकारचे कॉईन मध्ये लाखो करोडो रुपये गुंतवणूक केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. आज गुरुवार पासून आता देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही.त्याचसोबत क्रिप्टोकरन्सीच्या खात्यात पैसे टाकता येणार नाही किंवा काढताही येणार नाही.
जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही व्यक्तीला या व्हर्च्युअल करन्सीने पैसे पाठवता येतात. महत्त्वाचं म्हणजे या व्यवहारावर कुठल्याही बँकेचं नियंत्रण नसतं. अशा प्रकारचे व्यवहार काळा पैसा व गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्ती करत असतात.
पण आता भारतात देशातील कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँक ग्राहकाला व्हर्च्युअल करन्सीची ट्रेडिंग करता येणार नाही, त्यामुळे कॉईन च्या भुलभूलैय्या ला चांगलाच आळा बसेल.
No comments:
Post a Comment