फोटो - अप्पर जिल्हाधिकारी हदगल यांना लेखी निवेदन देतांना अॅड. विजय चौगुले व शेतकरी
हेरले / प्रतिनिधी
रत्नागिरी - नागपूर या महामार्ग रस्त्यासाठी मौजे वडगाव येथील शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत . रस्त्यासाठी पिकाऊ जमीन घेण्यास येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तीव्र विरोध केला आहे .
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वडगावमधील शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून प्रस्तावित रस्ता करण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे . कारण या पिकाऊ जमिनीपासून तीन कि.मी. अंतरावर मुंबई - बेंगलोर रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध आहे . असे असताना शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन घेतल्यास शेतकऱ्यांची विहिर , जनावरांचे गोठे, राहती घरे जाणार आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . त्यामुळे या रस्त्यास तीव्र विरोध शेतकऱ्यांकडून आहे . अशा आशयाचे लेखी निवेदन शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी हदगल यांना दिले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
निवेदनावर रावसो चौगुले , सदाशिव चौगुले , किरण सुलताने , प्रकाश थोरवत , विलास सावंत , विलास पोवार , गुंडोपंत कुलकर्णी, संतोष थोरवत, सिकंदर हजारी, प्रकाश परमाज, संजय सावंत, धनाजी सावंत, सखाराम सावंत, तानाजी सावंत, दिपक थोरवत, सुनिल सावंत, प्रकाश भोसले, कुमार परीट, तानाजी थोरवत, रामचंद्र चौगुले, आण्णासो थोरवत, प्रकाश जांभळे, मनोहर सावंत, श्रीकात सावंत, संभाजी थोरवत, भिकाजी पाटील, सुभाष सावंत, संजय थोरवत आदींच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment