Tuesday, 3 April 2018

कोल्हापूर सांगली मार्गावरील वाहने पार्कींग अपघातास कारणीभूत 


सलीम खतीब

हातकणंगले . / प्रतिनिधी दि. ३/४/१८


      कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर अनेकदा अपघात होऊन अनेकांचा जिव गेला तर कित्येक जण जखमी झाले आहे. या अपघाताना कारणीभूत ठरतो तो म्हणजे रस्त्यावर तर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मार्बल बाजारपेठ,गुळ , काकवी, मातीचे तवे , पेपर फोल्डर, लसी , उसाचा रस, चहा हातगाडी, नाष्टा सेंटर  चिकन६५ , चायनीज  यासारख्या स्टाॅलमुळे रस्त्यावर वाहतुकीची  कोंडी होत असल्याने अपघातात कारणीभूत ठरत आहे.याकडे ट्राफिक पोलिसांची नजर नाही का ?

       कोल्हापूर सांगली हा राज्य मार्गाचा काही भाग शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे वडगाव फाट्यापर्यंत येत असल्याने सांगली फाटा ते या मौजे वडगाव फाट्यापर्यंत मोठी मार्बल बाजारपेठ असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्बलचा व्यवसाय होत असल्याने याठिकाणी नेहमीच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते . खरेदी केले मार्बल वाहून नेण्यासाठी  अवजड वाहनांची गरज असते.ती वाहने या रस्त्याच्या  आजूबाजूला लावलेने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असतात. तसेच सध्या याठिकाणी परप्रांतीय लोकांनी कामगारांसाठी व प्रवाशांसाठी विविध खादयपदार्थांचे स्टॉल घातले आहेत.हे स्टाॅल चक्क रस्त्यावरच उभे केल्याचे पहावयास मिळत असल्याने वाहतुकीची  कोंडी होऊन याठिकाणी अपघातास कारण ठरत आहे .


    कांही दिवसापूर्वी हेरले येथील तरूण अभिजीत दिलीप बलवान( वय 25 ) या तरूणाचा अपघात याच रस्त्यावरून अपघात होऊन ठार झाला .पण हा अपघात रोडवर लावण्यात आलेल्या स्टाॅल मुळे झाला असल्याचे लोकातून बोलले जाते कारण हे स्टाॅल व्यवसायिक आपला माल विकण्या दृष्टीकोनातून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बोलावून वस्तू घेण्याचा घाट घालतात यांच्या बोलावण्याकडे वाहन चालकांचे गाडीवरील ताबा सुटून अपघात होत असतो.

     सांगली फाटा हा चौक नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी दररोज ट्राफिक जामचा प्रश्न उपस्थित होत असून येथे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात. याचा विचार करून शिरोली येथील एक उद्योजकाने लाखाची पोलिस कक्षाची केबीन भेट देऊन पोलिस ठाण्यास मदत केली. पण हि केबीन पोलिसाविना बंदच आहे .या  ट्राफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिरोली पोलिस ठाण्याने दोन ट्राफिक पोलिसांची या ठिकाणी नियुक्त केले आहे,पण हे दोघे वाहतूक सुव्यवस्थित लावण्याऐवजी हायवेवरील येणाऱ्या जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना अडवून त्याना त्रास देण्याचे काम केले जात आहे.ज्याठिकाणी ट्राफिकचा विषय निर्माण होतो त्याठिकाणी या दोन ट्राफिक पोलिसांची दांडी असते मग या दोन ट्राफिक पोलिसांची वर्णीवर लोकांच्यातून प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे .

      कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावरील रस्त्याकडील वाहतूकीस अडथळा ठरत असेलेली सर्व मार्बल बारपेठची व विविध स्टॉलची अतिक्रमणे काढून वाहतूकीस शिस्त लावावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

         फोटो कॅप्शन

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील वाहतूकीची कोंडी होणेसाठी व अपघातास कारणीभूत ठरत असेलेली उभी वाहने.

No comments:

Post a Comment