हातकणंगले / प्रतिनिधी दि. १४/५/१८
सलीम खतीब
शाहू क्रीडा मंडळ सडोली संघाने तरूण भारत सांगली संघावर १९ गुणांनी मात करत प्रथम क्रमांक पटकाविला.तरूण भारत सांगली संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.हेरले क्रीडा मंडळाच्या निमंत्रित मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचा थरार अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
हेरले क्रीडा मंडळांने अनेक क्रीडा रत्न तयार केले. त्या रत्नांनी विविध शासकिय विभागातून सेवा बजावतही कब्बड्डी खेळास उंच्ची व दर्जा मिळवून देऊन मंडळाचा लौकिक वाढविला आहे. या गावची मातीच कब्बड्डी खेळासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे मत माजी जि.प. उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांनी व्यक्त केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी बोलत होते.
माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की, गेली सहा महिने गावांमध्ये सार्वजनिक लोकोत्सव संपन्न होऊ शकला नाही. मात्र हेरले क्रीडा मंडळाच्या कब्बड्डी स्पर्धेने गाव एकवटला आहे.अशाच प्रकारे निवडणूकी पुरताच विरोध मानत तदनंतर सदैव गट तट विसरून अशी एकता अखंड गावांत प्रस्थापित राहावी. हे कार्य या मंडळाने केले आहे. खरोखरच हा उपक्रम स्तूत्य आहे.
उप उपांत्य फेरीचे सामने निकाल- ओमसाई तळसंदे संघाने किणी विद्यार्थी मंडळ संघावर ११ गुणांनी, तरूण भारत सांगलीने जय शिवराय हेरलेवर ६ गुणांनी, शाहू सडोलीने जय हनुमान बाचणीवर ५ गुणांनी, सम्राट सांगलीने जयकिसान वडणगेवर ४ गुणांनी ,शिवशाहू सडोलीने ओमसाई तळसंदेवर १५ गुणांनी, तरुण भारत सांगलीने नवभारत शिरोलीवर१२ गुणांनी, शाहू सडोलीने छावा शिरोलीवर १० गुणांनी, हेरले क्रीडा मंडळाने सम्राट सांगलीवर २ गुणांनी विजय मिळविले.
उपांत्य फेरी सामने निकाल
तरुण भारत सांगली संघाने अटीतटीच्या सामन्यात शिवशाहू सडोलीवर १ गुणांनी विजय मिळविला. शाहू सडोलीने हेरले क्रीडा मंडळावर ६ गुणांनी विजय मिळविला. दोन्ही सामने शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीचे झाले.
अंतिम सामन्यात शाहू सडोलीने एकतर्फी ४२ गुण मिळविले. तरूण भारत सांगलीने २३ गुण प्राप्त केले. शाहू सडोली संघाने प्रतिस्पर्धी संघास १९ गुणांनी सहज नमवून अजिंक्य ठरला. शाहू सडोली प्रथम क्रमांक रोख २१ हजार व चषक, तरुण भारत द्वितिय क्रमांक रोख १५ हजार व चषक, तृतीय क्रमांक हेरले क्रीडा मंडळा५ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक शिवशाहू सडोलीस ५ हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कामधेनू समुह प्रमुख आदगोंडा पाटील, अभियांता धनाजी वड्ड , आण्णासो गावडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
उत्कृष्ट खेळाडू हेरले क्रीडा मंडळाचा राहुल कोळेकर, उत्कृष्ट चढाईपट्टू शाहु सडोलीचा सागर गजबर, उत्कृष्ट पक्कड तरुण भारत सांगलीचा अरूण नराले आदी खेळाडू वैयक्तिक बक्षिसास पात्र ठरले त्यांना मनगटी घडयाळ, एअर कुलर देऊन सन्मानित करण्यात आले.पंचप्रमुख कुबेर पाटील, मनोज मगदूम, संतोष घाडगे, अमर नवाळे, अभिजीत पाटणे, उत्तम नलवडे, कमरूद्दीन देसाई, सागर लंबे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
या प्रसंगी आण्णासो गावडे, सपोनि अस्लम खतीब, अजित पाटील, गणी देसाई,विनोद वड्ड, प्रकाश खुपिरे,उत्तम माळी, भरत कराळे, बाबासाहेब कोळेकर, केशव मिरजे, जयकुमार करके, नारायण कटकोळे, प्रा. भाऊसाहेब वड्ड, अजरूद्दीन खतीब, बाबू बारगीर, सचिन भोसले, सुरज कोळेकर, प्रकाश हक्के, संजय खाबडे कर्मचारी आदी मान्यवरासह क्रीडा शौकिन मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
फोटो
हेरले येथील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचा विजेता शाहू सडोली संघास बक्षिस व चषक प्रदान करतांना मान्यवर
No comments:
Post a Comment