कोल्हापूर प्रतिनिधी
मिलींद बारवडे
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेतील त्रुटी विरूद्ध संवर्ग ५ मधील अन्यायग्रस्त शिक्षकांच्यासाठी शिक्षक समन्वय समिती कोर्टात जाण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. नागनाथ मंदिरात बदली विरूद्ध धोरणात्मक निर्णयासाठी आयोजित शिक्षक समन्क्य समितीच्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला.
राजाराम वरुटे व प्रसाद पाटील या दोन्ही राज्याध्यक्षांचे कार्य प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच प्रसारमाध्यमांनीही विविध समस्या परखडपणे मांडत शिक्षकांना एकवटन्याचे कार्य नेटाने केले आहे. शिक्षक नेते मित्रत्व म्हणून कार्य करीत असून प्राथमिक शिक्षकाचे अधिकार शासन काढून घेत आहे त्यासाठी संघटीत लढा देणे आवश्यक आहे. असे मत कोल्हापूर शिक्षक संघ संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले यांनी व्यक्त केले. ते समन्वय समितीच्या अन्यायकारक बदली संदर्भात आयोजित सभाप्रसंगी बोलत होते.
शिक्षक नेते मोहन भोसले पुढे म्हणाले की अन्याय सहन करणे पाप आहे. सर्वांनीच बदली संदर्भात धाडसी निर्णय घेऊन कार्य केले पाहीजे. त्यासाठी नेत्यांनी शिक्षकांनी सर्व सनदशिर मार्गांचा अवलंब केला पाहिजे. शिक्षकांनी त्रुटी समजून घेऊन त्यावर उपचारात्मक मार्ग शोधले पाहिजेत. अन्यायाच्या विरूद्ध लढने आमचे कार्य असून वेळोवेळी जि.प. पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.अन्याय होणाऱ्या बाजूस आम्ही सतत आहोत. म्हणून महाराष्ट्रात प्रथम समन्वय समिती कोल्हापूरात स्थापन करून विविध समस्या सोडविण्यात यशस्वी झालो आहोत. नेत्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच या चळवळीत अग्रभागी होऊन समस्यांचे निराकरण करण्यास क्रीयाशिल राहावे.प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक निवडून वकीलांमार्फत शासनाशी वैचारिक व कागदोपत्री चर्चा करणे महत्त्वाचे बनले आहे.
समन्वय समिती मार्गदर्शक राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी शासनाने बदली संदर्भात कशी अन्यायकारक खेळी केली आहे त विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्हयात मोठेे मोर्चे काढून प्रशासनास जाग आणण्याचा मनोदय व्यक्त केला.
समन्वय समिती मार्गदर्शक राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले की, बहुजन शिक्षकांची वाट लावण्याचे कार्य शासनाच्या या अन्यायकारक बदली धोरणांने केले आहे.बदली संदर्भातील संवर्ग १ते ४मधील त्रुटी कोणकोणत्या आहेत त्या स्पष्ट करून लढा न देता हरण्यापेक्षा लढा देऊन हरणे या तत्वाचा सर्वांनी स्विकार करून न्यायालयीन लढयासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. न्यायालयीन लढा निश्चित जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला.
समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले की, शासनाच्या बदली धोरणातील विविध संवर्गात खुप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. विस्थापित शिक्षकांच्या वरील अन्याय दूर करणेसाठी व या त्रुटी दूर करण्यासाठी बदली धोरणा विरोधात न्यायालयीन लढया शिवाय पर्याय नाही. त्यामुळे समन्वय समितीच्या वतीने बदली विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रसंगी जिल्ह्यातून विविध संघटनांचे प्रमुख शिक्षक व शिक्षिका पदाधिकारी उपस्थित होते. अर्जुन पाटील, गौतम वर्धन, सुधाकर निर्मळे,सतीश वरगे, सुनिल पाटील, संजय कुर्डुकर, हरिदास वर्णे, एस.के. पाटील, चंद्रकांत पाटील, कल्पना जाधव, स्मिता डिग्रजे, रघुनाथ खोत, प्रशांत पोतदार, शरद केनवडे, संदीप माने, संदीप मगदूम धनाजी पाटील, राजेंद्र पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
फोटो
शिक्षक समन्वय समितीमध्ये मार्गदर्शन करतांना शिक्षक नेते मोहन भोसले , राजाराम वरुटे, प्रसाद पाटील,रविकुमार पाटील व इतर मान्यवर
No comments:
Post a Comment