हेरले / प्रतिनिधी दि. २७/५/१८
रत्नागिरी -सांगोला महामार्ग हा विकासकांच्या फायदयाचा असून शेतकरी वर्गास मारक आहे. खासगीकरणातून हा मार्ग तयार होत आहे. या मार्गास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव या विभागाचा खासदार या नात्याने राहणार असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
माजी सभापती राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य मामा पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली टोप, चोकाक, हेरले, मौजे वडगांव , नागांव, माले ,शिये आदी गावातील शेतकरी शिष्टमंडळाशी ते चर्चा प्रसंगी बोलत होते.
या गावातील शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीतून पाच ते दहा किलोमीटर कोटयावधी रुपये खर्च करून पाणी पुुरवठा योजना कार्यान्वीत करून जिरायती शेती बागायती बनविली आहे. मात्र प्रशासन या शेतीस जिरायतीच्या नावाखाली जमिन संपादित करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे.कोल्हापूर सांगली महामार्ग चौपदरीकरण झालेले असल्याने वास्तवतः या मार्गाची गरजच नाही. नागांव, टोप,शिये या गावांलगतच राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे या रत्नागिरी -सांगोला मार्गामुळे बागायती शेती जिरायती शेतीच्या नावे कवडीमोल भावाने संपादन सुरू आहे. या परिससरातील सर्व शेतकरी या रस्त्यास विरोध करीत आहेत. खासदार या नात्याने सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रियाशील राहणार.
या वेळी अशोक मुंडे, पोपट चौगुले, मुनिर जमादार ( हेरले) माजी सरपंच अभयसिंह पाटील (माले)राजेंद्र पाटील, बि. टी. सावंत, भाऊसाहेब कोळी ( नागांव), रंगराव गायकवाड रणजित पाटील ( टोप ), महावीर आलमाने, जलद पाटील (चोकाक), बाजीराव थोरवत,अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले (मौजे वडगांव )
फोटो
खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करतांना शेतकरी शिष्टमंडळ
No comments:
Post a Comment