हेरले / प्रतिनिधी दि. २८/५/१८
चोकाक गावच्या विकासासाठी कटिबध्द असून या गावची कायमची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी विशेष मुख्यमंत्री निधीतून पेयजल योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही योजना पुढील एका वर्षात कार्यान्वीत होईल असे प्रतीपादन रुकडी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांनी केले.
चोकाक( ता. हातकणंगले) येथे जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांनी त्यांच्या फंडातून २५ लाखाची विविध विकास कामासाठी मंजूर केले आहेत. आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कामांचा शुभारंभ त्यांच्यासह प. स. सदस्या मेहरनिगा जमादार, माजी सभापती राजेश पाटील, माजी सभापती अविनाश बनगे , मुनिर जमादार, गटनेते कृष्णा निकम, सुकुमार बुकशेटे,तातोबा जाधव, सचिन पाटील,सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच विकास चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
गावातील दलीत वस्ती रस्ता डांबरीकरण व गटर्स ९.५ लाख,रूकडी चोकाक रस्त्याचे पॅचवर्क ५ लाख, पंचवीस /पंधराअंतर्गत चॅलेंज ग्रुप गल्ली गटर्स ५ लाख, मराठी शाळा छ्त दुरुस्ती ४ लाख, सार्वजनिक दर्गा तालीम मंडळ प्लेव्हींग ब्लॉक २ लाख आदीसाठी २५ लाख रुपयांची विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, सुकुमार पाटील, लता पाटील, अर्चना हलसवडे, विजय ननवरे, सुवर्णा सुतार, स्मिता सरदार, योगेश चोकाकर, कल्पना जाधव, मनिषा कुंभार, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
मौजे चोकाक येथे विकास कामांचा शुभारंभ करते वेळी जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, मेहरनिगा जमादार, सरपंच मनिषा पाटील व इतर मान्यवर
No comments:
Post a Comment