हेरले / प्रतिनिधी
सलीम खतीब
दि. ३/७/२०१८
हेरले ( ता. हातकणंगले) यथीले विनय विश्वनाथ तोडकर यांची हॉर्नेट १६० कंपनीची दुचाकी अज्ञाताने जाळून खाक केली.
विनय विश्वनाथ तोडकर गावामध्ये जैन मंदिर जवळ राहतात. यांच्या मालकीची दुचाकी हॉर्नेट१६० (क्र. एमएच०९डीवाय६७१५) घरासमोर लावली होती. सोमवारी मध्यरात्री आज्ञाताने या गाडीस आग लावली या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली.आगीची झळ इमारतीच्या पीव्हीसी पाईप्स लागून अर्धवट जळाली . मध्यरात्री गाडीस आग लागल्याली कोणालाच समजली नसल्याने आग विझवता आली नाही. त्यामुळे या अगीत दुचाकी पूर्णपणे जळाली.
मागील काही महिन्यापूर्वी बुलेट दुचाकीस आग लावून जाळून खाक केली होती. या दोन्ही घटना शंभर मिटर अंतरामध्ये घडल्या आहेत. मध्यवस्तीतील घरासमोरील दुचाकी वाहने जाळण्याचे धाडस माथेफिरू कडून होत आहे. दुचाकीच्या आगीमुळे स्फोट होऊन काही अनर्थ घडला नाही म्हणून बरे झाले,नाहीतर भयावह परिस्थिती निर्माण झाली असती. गावामध्ये अशा वारंवार किंमतीवान गाडया जाळन्याच्या घटना घडत आहेत. बहुतांश दुचाकी गाडया ग्रामस्थ घरासमोर लावतात त्यामुळे असुरक्षित व भितीचे वातावरण गावामध्ये निर्माण झाले आहे.पोलीसांनी गाडीस आग लावणाऱ्या माथेफिरुचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.एल. डुबल करीत आहेत.
फोटो
हेरले येथे अज्ञाताने पेटविलेली दुचाकी जळून खाक झालेल्या अवस्थेतील.
No comments:
Post a Comment