कोल्हापूर प्रतिनिधी - दि. 15 जुलै 2018
धो- धो पावसाच्या सरी... बोचरा वारा...
त्यात रविवार!
अशावेळी कोणीही घरात राहून आराम करत मस्त चहाचा गरम-गरम घोट घेणेच पसंद करेल.
परंतु, कोल्हापूर येथील पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या 'Only Environment' या ग्रुप सदस्यांनी मात्र रविवार दि.१६.०७.२०१८ रोजी सकाळी-सकाळी थेट गाठला 'पोहाळे' गावचा डोंगर.
एका हातात स्वतः बियापासून तयार केलेली देशी वृक्षांची रोपे तर दुसऱ्या हातात खड्डे खणण्यासाठी हत्यारे.
वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा व पायाखालून वाहणारे छोटे -छोटे धबधबे अशातच डोंगर उतारावरील निसरड्या वाटा, चोहीकडे हिरवाई ने नटलेल्या अशा या ऐतिहासिक लेणी परिसरात वृक्षांची संख्या तशी खूपच कमी आहे. नेमकं हेच ओळखून पर्यावरणप्रेमींच्या या ग्रुप ने एकत्र येत या परिसरात वृक्षारोपण केले. यामध्ये पळस, जांभूळ, चिंच या देशी वृक्षांचा समावेश आहे.
या ग्रुप चे संघटक व पर्यावरणशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा.अनिल धस व प्रा. सुनिल शिंदे यांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
'यापूर्वी गेल्या महिन्यात याच परिसरात एक हजार देशी वृक्षांच्या बियांचे रोपण आम्ही केले आहे या सोबत या रोपांचे संवर्धन यापुढे वर्षभर आम्ही करणार आहोत' असे प्रा. अनिल धस यांनी यावेळी 'MH09 Live News' शी बोलताना सांगितले.
या यावेळी प्रज्योत साळोखे, कु.भाग्येश शिंदे, पोहाळे गावचे क्रियाशील सरपंच श्री. दादासाहेब तावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पोवार , सदस्य श्री. बोरचाटे, कु. रोहित पाटील,पंचगंगा बँकेचे अध्यक्ष श्री. टिपूगडे साहेब व पंचगंगा बँकेचे सर्व स्टाफ यांनीही यावेळी उस्फूर्तपणे सहभागी होऊन वृक्षरोपण केले.
आदर्श उपक्रम...! 👌👌👍
ReplyDelete