Friday, 13 July 2018

शासनाच्या पवित्र पोर्टल विरोधात तीव्र आंदोलन - एस डी लाड

कोल्हापूर/ प्रतिनिधी 

      मिलींद बारवडे

    कोल्हापूर जिल्हयातील शिक्षण संस्थाचालक शासनाच्या पवित्र पोर्टल विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी दिला. संस्थाचालकांची पोर्टल विरोधात सभा शुक्रवार दि.२० जुलै रोजी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस कोल्हापूर येथे होणार असून जिल्हयातील ३५० संस्थाचालकांनी या सभेस दुपारी २ वाजता उपस्थित राहावे असेही आवाहन संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी केले आहे.

         प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस मध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते. सभेमध्ये अन्यायीकारी पवित्र पोर्टल या शिक्षक भरती आदेशाची जाहीरपणे होळी केली जाणार आहे. पवित्र पोर्टल नुसार भरती केल्यास टीईटी पात्र शिक्षकांची कमतरता असेल, कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता संस्थावर शिक्षक लादले जाणार आहेत या आदेशापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा तसेच समायोजनेचा प्रश्न अदयापी शासनाने सोडविला नसल्याने या पवित्र पोर्टलमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          शिक्षण संस्थाचालकांचे अधिकार या आदेशामुळे काढून घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी नेमलेल्या शिक्षकांचे प्रश्न प्रलंबीत असतांना शासन असा विचित्र आदेश कसा काय काढू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या आदेशाला तीव्र विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली पवित्र पोर्टलची होळी २oजुलैच्या सभेत केली जाणार आहे. संपूर्ण राज्यात या पवित्र पोर्टल विरूद्ध आंदोलन शिक्षण संस्थाचालक महामंडळ करणार आहे.

    या सभेस वसंतराव देशमुख, प्रा. जयंत आसगावकर, सी.एम. गायकवाड, बी.जी. बोराडे, व्ही.जी. पोवर, डॉ.ए.एम. पाटील, डी.एस. घुुगरे, बी.जी. काटे, के.बी. पोवार, सुधाकर निर्मळे, अशोक पाटील, सुरेश पाटील, बी.बी. पाटील, उदय पाटील, के.के. पाटील, प्रभाकर आरडे, पी.के. पाटील, भरत रसाळे, के.एच. भोकरे, पी.एस.हेरवाडे, सुंदरराव देसाई, डॉ.विरेंद्र वडेर, संदीप पाटील, मिलींद बारवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार उदय पाटील यांनी मानले.

    फोटो कॅप्शन

शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड बोलतांना

No comments:

Post a Comment