Saturday, 14 July 2018

हेरले व अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा थ

हेरले / प्रतिनिधी दि. १४ / ७/१८


हेरले व अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा चावा घेऊन जखमी केले.

       हेरलेमध्ये शनिवारी सकाळी भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने  अशोक तुकाराम भोसले ( वय ५०),पारीसा शंकर चौगुले ( वय ७४), सुरेश कृष्णा वडर ( वय ४३ )छबूताई यमण्णाप्पा आठवले ( वय ८०), श्रीपाल् दादू खोत ( वय ५५) आण्णाप्पा जिनगोंडा पाटील ( वय ७o) आदी सहा जणांना गावात विविध ठिकाणी चावा घेऊन जखमी केले.  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. चेतन शिखरे यांनी जखमिंना रेबिजची लस देऊन उपचार  केले. यानंतर तीन रेबिजचे डोस काही दिवसाच्या अंतराने जखमिंना घ्यावे लागणार आहेत. छबूताई आठवले, श्रीपाल खोत, आण्णाप्पा पाटील यांच्या पायावर कुत्र्याच्या दाताच्या चाव्याच्या खोलवर जखमा झालेने पुढील उपचार  (एआरएस) डोससाठी त्यांना सीपीआर दवाखान्यामध्ये पाठविले आहे.

     अतिग्रे गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अरविंद कृष्णा कांबळे ( वय५० ) महेश अरविंद कांबळे ( वय २१) यांना चावा घेऊन जखमी केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजची लस देऊन उपचार करण्यात आला. हेरले गावांमध्ये भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढले असून त्यांचे निर्बिजीकरण करून तसेच या कुत्र्यांना पकडून अन्यत्र सोडणे गरजेचे बनले आहे.या घटनेने गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.

No comments:

Post a Comment