Saturday, 14 July 2018

माले येथे कृषी दिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन



हेरले / प्रतिनिधी दि. १४/७/१८

    मौजे माले (ता हातकणंगले) कृषी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात विविध विषयावर मार्गदर्शन केले.

     ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषीकन्या मार्फत हुमणी किड नियंत्रणावर चर्चासत्र आयोजित करत आले.यावेळी  अस्लम वालंडकर यांनी हुमणी किड नियंत्रण या विषयावर शेतकऱ्याशी चर्चा केली यामध्ये हुमणी किडीचा जीवनक्रम, संवेदनशील कीड व्यवस्था , प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके व त्यांचा योग्य वापर इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता.याप्रसंगी  राहुल पाटील (कृषी सहाय्यक हातकणंगले) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सरपंच उमेश पाटील, उपसरपंच  सुनील कांबळे  , पोलीस पाटील संदीप साजनकर , माजी उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील सेवानिवृत्त पदाधिकारी आदींनी मनोगते व्यक्त केली.

    याप्रसंगी प्रा.उत्तम कदम यांनी ऊस लागवड व्यवस्थापन खरीप पिके याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. यामध्ये ऊस पीक हंगाम लागवड ऊस पिकातील आंतरपिके व पाणी व्यवस्थापन या मुद्द्यांचा समावेश होता .यावेळी कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील डॉ. जी.जी. खोत, डॉ. विजय तरडे, डॉ.के .व्ही. गुरव, डॉ. विलास करडे ,श्री बजरंग चव्हाण आदी उपस्थित होते.पं.स. सदस्या मेहरनिगा जमादार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याबरोबरच  गावचे  प्रमुख ग्रामस्थ मंडळी व शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे कृषीकन्या सुस्मिता पाटील ,पूजा नन्ना, अक्षता नाळे,विशाखा मूसळे व अनुराधा गावडे आदींनी संयोजन केले.

         फोटो 

माले येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना अस्लम वालंडकर शेजारी मान्यवर

No comments:

Post a Comment