वाळवा- अजय अहीर
1 सप्टेंबर पासून इंग्लड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी सुरेश सावंतला आर्थिक मदत मिळाली आहे.
MH9 LIVE NEWS च्या माध्यमातून खो खो पटू सुरेश सावंतला इंग्लंड स्पर्धेसाठी हवा आहे आर्थिक मदतीचा हात ! अशी बातमी दि 22 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झाली होती.
याला प्रतिसाद मिळाला आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष-संग्राम देशमुख, सी.ई.ओ. अभिजित राऊत, शिक्षण अधिकारी-निशादेवी वाघमोडे, प्राचार्य डॉ-सुषमा नायकवडी सभापती महिला व बालकल्याण समिती यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्हा परिषदेमार्फत ,चाळीस हजार रुपयेची मदत मिळाली आहे. सुरेश सावंत हा स्व. अरुण (भैय्या)नायकवडी क्लबचा खेळाडू आहे.
यावेळी चाळीस हजार रु. धनादेश देताना प्रा.डॉ.सुषमा नायकवडी सभापती महिला व बालकल्याण समिती,क्रीडा शिक्षक-अशोक कदम,अजित घोरपडे,मानाजी सापकर,ओंकार आचरे, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment