**
कसबा बावडा,दि.२७:
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २७ जूलै २०१८ हा दिवस 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा करण्यात आला. शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून साजरी केली.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटकार्ड ,गुलाबपुष्प,पेन आदी वस्तू भेट व प्रेमळ शुभेच्छा देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले.
मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले
" विद्यार्थ्यांनी गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगून आपल्या आयुष्याचे सोने करावे ."
सदर गुरुपौर्णिमेनिम्मित शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात राजवर्धन अडनाईक,मृणाली दाभाडे,रसिका माळी, बापू गाढवे,पृथ्वीराज लाखे,शार्दूल सुतार,सिद्धार्थ मोरे,वेदांतीका पाटील,निशिका शिंदे,चिन्मय पोवार,आशिषा गायकवाड,पियुष सरगर,राहुल बंडगर,अनुष्का साठे आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून आपल्या गुरू कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाला उत्तम कुंभार,सुशील जाधव सुजाता आवटी,जयश्री सपाटे,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे आदी उपस्थित होते.शाळेमध्ये गुरुपौर्णिमा अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करणेत आली.
छान बातमी आहे व विद्यार्थी नावे असले मुले बातमी आवडली आहे
ReplyDeleteआभारी आहोत,
मुख्याध्यापक,राजर्षी शाहू विद्यामंदिर,कसबा बावडा,कोल्हापूर.