*कसबा बावडा,दि.६ जुलै
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे नूतन सभापती मा.अशोक जाधव साहेब यांचा सत्कार मुख्याध्यापक अजितकुमार पाटील व सामजिक कार्यकर्ते संजय लाड यांचे हस्ते शाल,बुके,श्रीफळ,कोल्हापुरी फेटा,देऊन सत्कार करणेत आला.मा.अशोक जाधव सर यांचे स्वागत शाळेत झान्ज पथक व ढोल,शाळेत रांगोळी सजावट करून भव्य मिरवणुक काढण्यात आली.त्यावेळी विद्यार्थांनी छत्रपती शाहू महाराज की जय असा जयघोष केला.
सत्कार प्रसंगी सभापती अशोक जाधव यांनी शाळेस कसबा बावड्यतील एक मॉडेल स्कुल साठी निवड करत आहोत असे जाहीर केले.कारण या शाळेला सामाजिक,शैक्षणिक,राजकीय वारसा लाभलेले विद्यार्थी घडले आहेत. बावड्यातील मुलांनो भरपूर शिका आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन केले.
सत्कार कार्यक्रम चे अध्यक्ष संजय लाड यांनी राजर्षी शाहू विद्यामंदिर आय एस ओ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले.
शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले,सामाजिक कार्यकर्ते अभिजित जाधव,भारतवीर मित्रमंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले,दिलीप चौगले, नितीन जाधव,अक्षय चौगले,स्वप्नील चौगले, व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शुभांगी चौगुले,रमेश सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका माळी व मृणाली दाभाडे यांनी केले,तर आभार प्रतिभा कोरवी,सानिया कांबळे यांनी मानले.
सदरप्रसंगी शाळेतील शिक्षक उत्तम कुंभार , सुजाता आवटी,आसमा तांबोळी,शिवशंभू गाटे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,काळे मॅडम,मंगल मोरे, हेमंतकुमार पाटोळे,भिमराव लाखे,सत्यम सातपुते,प्रतीक बुचडे,सेजल दाभाडे,तनिष्का पाचंगे,शार्दुल सुतार,बापू गाढवे, त्याचबरोबर भागातील पालक व नागरिक,माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment