Wednesday, 4 July 2018

मतिमंद मुलांसाठी मदत करुन लग्नाचा वाढदिवस साजरा

हेरले / प्रतिनिधी : दि. ४/७/१८


     इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित अंकुर मतिमंद मुलांची निवासी शाळा शाहुनगर परिते ता. करविर  या शाळेस पीके सामाजीक सेवा ग्रुप मौजे वडगांवचे संस्थापक अध्यक्ष कॉ. प्रकाश कांबरे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून संस्थेचे कार्यवाहक मा.एस.एन. पाटील  यांना सहा हजाराची शाळेस मदत केली.

      सदर शाळेचे लोकवर्गणीतुन बांधकास सुरु असुन शाळेस शंभर विद्यार्थी संख्येची मंजूरी असुन सन २००६ साली या शाळेचा प्रारंभ झाला सुरुवातीला वीस विद्यार्थी संख्या असणारी शाळा आता जवळपास शंभरचे वर आकडा पार करून परिसरात एक चांगला नावलौकीक मिळवत आहे, या शाळेस खासदार छत्रपती संभाजीराजे, आम. सतेज पाटील, माजी आम. पी.एन. पाटील, धैर्यशील पाटील अशा विविध राजकीय , सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन यथाशक्ती मदत केली आहे.

        फोटो कॅप्शन

पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश कांबरे धनादेश एस.एन. पाटील यांना प्रदान करतांना.

No comments:

Post a Comment