कोल्हापूर ते शिये हा रस्ता टोल नाक्याजवळ पाणी आल्याने बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेटस लावून रस्ता बंद केला आहे तरीही काही वाहनचालक अवास्तव धाडस करत पाण्यात वाहन घालतात. अशीच घटना आज सायंकाळी घडली. इटिओस कार क्र MH12 GZ 3906 या वाहन चालकाने गाडी पाण्यात दामटत रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. आणि मध्यंतरी गेल्यावर कारमध्ये पाणी शिरल्याने कार बंद पडली.
चालकासहित प्रवाशांना धोका निर्माण झाला. नेमके याच वेळेस काही युवक पुर पाहण्यासाठी व गाडी धुण्यासाठी गेले होते त्यांनी प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाला फोन केला.
कसबा बावडा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने धाव घेतली आणि इटिओस कार मधील चालक व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले व कार ढकलत पाण्याबाहेर काढली.
वाहनचालकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की अवास्तव धाडस करून पुराच्या पाण्यात वाहन घालून जीवित धोक्यात घालू नये.
कसबा बावडा भगवा चौक येथे चार चाकी वाहनांस रस्ता पाण्यामुळे बंद आहे असा फलक लावणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment