Monday, 16 July 2018

गडकोट संवर्धन मोहिमे अंतर्गत किल्ले पावनगडावर वृक्षारोपण



पन्हाळा : 15 जुलै 2018

  1.       

   पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा , वुई केअर सोशल फाऊंडेशन , कोल्हापूर , ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडकोट संवर्धन मोहीम राबिवली जाते .आज या मोहिमे अंतर्गत शिवनिर्मित किल्ले पावनगडावर चिंच , जांभूळ , करंज , वड ,जारुळ आदी भारतीय वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे जवान मा .श्री .संदीप मोरे आणि रोहित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

            यावेळी दुर्गभ्रमंतीचे ही आयोजन केले होते .पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी पावनगडाच्या अपरिचित इतिहासावर मार्गदर्शन केले . आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असताना अशा प्रकारच्या अभियानातून समाजाचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन वुई केअर सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सुदर्शन पांढरे यांनी केले .गडकोट संवर्धन मोहिमेअंतर्गत केलेल्या कामांचा आढावा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हा उपाध्यक्ष धिरज कठारे यांनी घेतला .

             यावेळी अक्षय सावंत , रणजित शिंदे , शिवतेज तालुगडे , तानाजी साबळे , अनिकेत पाटील , किशोर पाटील , अक्षय जगदाळे , शुभम तोडकर , किशोर दराडे ,राहुल पाटील , स्वप्नील शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते .सूत्र संचालन स्वप्नील पाटील यांनी केले तर आभार राजू शेख यांनी मांडले ...

3 comments: