Monday, 16 July 2018

सक्तीच्या व ऐच्छिक विषयांच्या मान्यते बाबत शाळांच्यामध्ये संभ्रमवस्था - शिक्षण सचिवांना निवेदन

हेरले / प्रतिनिधी दि. १५/७/१८


    इयता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नवीन विषयांना मान्यता घेण्यासंबंधी निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने  कोल्हापूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव टी. एल.मोळे यांची भेट घेऊन माध्यमिक शाळांच्या समस्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

      सन २०१८-१९ पासून इयता दहावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सक्तीच्या व ऐच्छिक विषयांच्या मान्यते बाबत शाळांच्यामध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली असून याबाबत माध्यमिक शाळांच्या कडून प्रस्ताव न मागवता हे विषय शासनानेच मान्य केले असल्याने केवळ शाळांच्या विनंती नुसार या विषयांना मान्यता द्यावी.अशी मागणी व्यासपीठाच्या वतीने करण्यात आली. 

    याबाबत बोलताना सचिव टी. एल.मोळे  यांनी सदरचा विषय आम्ही राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात कळविलेला आहे.मंडळाने कोणतेही पत्र याबाबत काढलेले नाही.सोशल मिडीयात फिरणारे पत्र अनाधिकृत आहे.राज्यमंडळाच्या अध्यक्षांनी या  विषयावर संबंधीतांची बैठक बोलावली असून त्याचा निर्णय शाळाना लवकर कळवण्यात येईल.त्यानुसार शाळांनी कार्यवाही करावी.

    राज्य मंडळाच्या शाळा सकेंतांक नूतनीकरणा बाबत २००५ नंतरच्या शाळाना मंडळाचा कायमस्वरूपी संकेतांक देण्यासंबंधी हे परिपत्रक असून अपुऱ्या मनुष्यबलामुळे काही वर्षे अनेक शाळांच्या वार्षिक तपासण्या झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.या प्रस्तावा सोबत शाळेची ज्या वर्षी शेवटची वार्षिक तपासणी झालेली असेल तो अहवाल जोडावा असे सांगितले.

    कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिस्टमंडळामध्ये अध्यक्ष एस.डी.लाड, सदस्य बी.जी.बोराडे, के.के.पाटील,उदय पाटील,संदीप पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ.ए.एम.पाटील,संचालक बी.बी.पाटील,राज्य महामंडळ सदस्य डी.एस घूघरे,सि. एम. गायकवाड,  सुधाकर निर्मळे आदी उपस्थित होते.

         फोटो 

कोल्हापूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव टी. एल. मोळे यांना निवेदन देताना अध्यक्ष एस.डी. लाड व इतर मान्यवर

No comments:

Post a Comment