Monday, 20 August 2018

मातृभाषेबरोबरच इंग्रजीचे ज्ञान आवश्यक - पद्मसिंह पाटील यांचे शालेय गणवेश वाटप प्रसंगी प्रतिपादन

कागल / प्रतिनिधी दि. १४/८/१८


    आई -वडील व शिक्षकांचा जीवनामध्ये सदैव सर्वांनी आदर करावा. गणवेशामुळे एकता निर्माण होऊन आपली व समाजातील सर्वांची ठळकपणे ओळख निर्माण होते. त्यामुळे सर्वच घटकात गणवेश महत्त्वाचा आहे. विदयार्थ्यांनी मातृभाषे बरोबर इंग्रजीचे ज्ञान अवगत करून घ्यावे. त्यामुळे जगाची सहज ओळख होते. असे प्रतिपादन युवा उद्योजक पद्मसिंह रणजितसिंह पाटील यांनी केले.

        श्री शाहू हायस्कूल कागलमध्ये  गरीब  व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता त्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.बी. रुग्गे होते. स्वागत व प्रास्ताविक एस.के. भोसले यांनी केले.

              प्रमुख पाहुणे कोजिमाशी माजी चेअरमन तथा कौन्सील मेंबर बाळासाहेब डेळेकर म्हणाले की, गोकूळ संचालक रणजितसिंह पाटील यांनी ३५ वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना यथाशक्ती  मदत केली. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याचे प्रतिबिंब त्यांच्या चिरंजिवांच्या सामाजिक कार्यातून दिसत आहे. गोरगरिब विदयार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानी होण्यासाठी शैक्षणिक साहित्याची मदत करणे म्हणजे खरोखरच आदर्शवत कार्य आहे.

      उद्योजक पद्मसिंह पाटील यांनी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश वाटप करून स्वातंत्र्यदिनास गरीब व होतकरू विदयार्थ्यांना अनोखी भेट दिली. ते कागल तालूक्यात अनेक शाळांमध्ये गेली दोन वर्षे गणवेश, पुस्तके, वह्या आदी  शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ग्रामिण भागातील मुलांना शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे अतुलनिय कार्य करीत आहेत.

       प्रथमतः पद्मसिंह पाटील, बाळासाहेब डेळेकर यांचा सत्कार शालेय प्रशासनाच्या वतीने प्राचार्य एम.बी. रूग्गे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता असिफ मुल्ला, कार्यवाह के.बी. वाघमोडे, उपमुख्याध्यापक आर.जी. देशमाने, पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी, उपप्राचार्य बसाप्पा मडिवाळ,तंत्र विभाग प्रमुख सुधाकर नाईक,एस.यु.देशमुख,संजय पोतदार, शंकर खाडे, के.एच. भोकरे, आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद विदयार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कादर जमादार यांनी केले. आभार महेश शेडबाळे यांनी मानले.

          फोटो 

श्री शाहू हायस्कूलमध्ये गणवेश वाटप करतांना पद्मसिंह पाटील, बाळासाहेब डेळेकर, प्राचार्य एम.बी. रूग्गे व अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment