माजगांव प्रतिनिधी:—
दि.२०/६/२०१८
रोटरी क्लब आॅफ टेस्क्टाईल सिटी यांच्या मार्फत पोर्ले/ठाणे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी बोलत होते.
आजची पिढी अतिशय भाग्यवान आहे कारण ती इंनटरनेटच्या युगात घडत आहे.त्यामुळे आजच्या विद्यार्थ्याला आपल्याला पाहिजे त्या शिक्षकाकडून ज्ञान घेता येईल.शिक्षकांची भुमिका फॅसिलेटरची झाली आहे.असे मत योगेश जाधव दै.पुढारी अध्यक्ष उर्वरित महाराष्र्ट वैधानिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी मांडले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असलेचे मत अमरिष घाटगे सभापती अर्थ व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मांडले.
जिल्हा परिषद सदस्या प्रियांका पाटील म्हणाल्या की मागास वंचित घटकांना ज्ञानदान करणार्या शाळा टिकल्याच पाहिजेत.भविष्यातील रेडकार्पेटवरील रणरागिणी याच विद्यार्थिनी असतील.
गणवेशामुळे कोणता मुलगा साहेबांचा आहे आणि कोणता मुलगा कामगाराचा आहे याचा पत्ता लागत नाही.सर्वांना समान पातळीवर ठेवतो.गणवेश हा समानतेच तत्व घेवून जोडणारा धागा आहे.रोटरी क्लब गरजूंना मदत करणारी जगातील नं.१ची संस्था आहे. असे विचार संग्राम पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी २०२०—२१यांनी मांडले.
कार्यक्रमाला के. डी.सी.सी. बॅकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,सर्व शाळेंचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक उपस्तिथ होते.
No comments:
Post a Comment