हेरले / प्रतिनिधी दि. ३१/८/१८
विश्व वारणा विद्यालय तळसंदे येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय "तायकाॕदो" स्पर्धेत बालाजी हायस्कूल सैनिक पॅटर्न निवासी शाळा मौजे मुडशिंगीच्या ( ता. हातकणंगले) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
कु.गौरव भोसले-सिल्व्हर , कु..सतेज दाभाडे-ब्रांझ, कु.तेजस गोडसे-ब्रांझ , कु.प्रथमेश पाटील-ब्रांझ आदी खेळाडूनी यशस्वी कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन जाधव , सचिव अमोल जाधव,मुख्याध्यापक कुमार शिंदे तसेच प्रशिक्षक -निलेश परीट व प्रज्वल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
बालाजी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला.यावेळी हाॕकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार मुख्याध्यापक .शिंदे के.एस. यांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची व विविध खेळाची विद्यार्थाना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थानी सर्व खेळामध्ये उत्तुंग यश मिळवण्याची ग्वाही दिली.यावेळी क्रीडाप्रशिक्षक परीट एन .बी, श्री.जाधव .ए.जी,श्री. पाटील.एस.के. श्री.खरसे व्ही .एस,गवळी.जी.आर,चोकाककर .एस .एस ,मुजावर एस .एस आदी उपस्थित होते.
फोटो
बालाजी हायस्कूल मुडशिंगीतील यशस्वी खेळाडू सोबत प्रशिक्षक वर्ग
No comments:
Post a Comment