हेरले / प्रतिनिधी दि.२९/८/१८
हातकणंगले पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने लाच म्हणून रक्कम देण्याचे आमिष दाखवले असतानाही लाच न घेतल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .एम .कदम (आर्थिक गुन्हे शाखा , कोल्हापूर ) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेशानुसार रोख रुपये दहा हजार रुपये व सी नोट देऊन सन्मान केला आहे .
लाच देणे व घेणे हे कायद्याने गुन्हा असल्याने आर.एम. कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित आरोपीविरूध्द तक्रार केल्यामुळे लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा लावला होता व लाच देताना संबंधितास पकडले होते . त्यामुळे सपोनि रविंद्र कदम यांच्या या कामामुळे पोलिस दलाची जन माणसातील प्रतिमा उंचावली आहे . म्हणून चांगल्या कामगिरीला उत्तेजना मुंबई पोलिस नियमावलीनुसार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार हे बक्षीस दिले आहे .
No comments:
Post a Comment