हेरले / प्रतिनिधी दि. २९/८/१८
मौज वडगाव ( ता. हातकणंगले)येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन पदी बशीर रसुल हजारी यांची तर व्हा. चेअरमनपदी सौ. सुशिला आनंदा गोरड.यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळत्या चेअरमन सौ. उमा चौगले या होत्या.
हातकणंगले तालुक्यातील एक नामवंत व पहिली आयएसओ मानांकन संस्था म्हणून कामधेनु संस्थेचा उल्लेख केला जातो.
या संस्थेवर संयुक्त ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे. रोटेशन नुसार हि निवड करण्यात आली.
यावेळी आघाडीचे प्रमुख मानसिंग रजपूत, सरपंच काशिनाथ कांबळे, माजी सरपंच मुबारक बारगीर, उपसरपंच किरण चौगले, संजय चौगुले, बेबी हजारी, महंमद हजारी, गुंडा कांबरे, संजय सावंत, वैशाली परमाज, लता जंगम, भारती सावंत आदी उपस्थित होते.स्वागत व विषय वाचन सेक्रेटरी रमेश लोंढे यांनी केले. आभार संजय चौगले यांनी मानले.
No comments:
Post a Comment