वाळवा - अजय अहीर
क्रांतिसिह नाना पाटील कॉलेज वाळवा येथे आर्ट्स शाखेचा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.प्रतिमा पूजन एक दिवसीय प्राचार्य साईनाथ सुर्यवंशी व प्रा.बी .एस. माळी, प्रा.राजा माळगी यांच्या हस्ते करण्यात आले. नीलम चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सर्व प्राध्यापक शिक्षक यांचा सत्कार विध्यार्थी व विद्यार्थ्यांनि यांनी केला. तर एक दिवसीय झालेले सर्व शिक्षक यांचा सत्कार प्रा.बी.एस. माळी यांनी केला.त्यानंतर विद्यार्थी शिक्षकानी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्रा.बी. एस. माळी होते.स्वप्नील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षक , विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.शुभम कदम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment