कोगनोळी ः येथे स्मशान शेडची स्वच्छता करताना जनसेवा मंडळाचे पदाधिकारी
------------------------
कोगनोळी, अनिल पाटील ता. 21 ः
येथील बिरदेव माळाजवळ आसलेल्या स्मशान भुमीची जनसेवा तरूण मंडळ प्रभाग क्रमांक 3 च्या कार्यक्रर्त्यांनी स्वच्छता करून घेतली. त्यांच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना अजित वठारे म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून येथे मोठया प्रमाणात धाणीचे साम्राज्य पसरले होते. लोक अनेक प्रकारे येथे घाण करत होते. त्यामुळे अंतविधी करण्यासाठी आलेल्या लोकांना त्रास सहन करावा लगात होता. त्यासाठी मंडळाचे कार्यक्रर्त्ये यांच्याकडून स्वच्छता करून घेतला आहे. या आधी मंडळाकडून बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळाकडून वृक्षारोपन करण्यात येणार आसल्याचे सांगीतले. या कामी तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य कृष्णात भोजे, संजय डूम, राजू चौगुले, पोपट पसारे, बद्रीनाथ निकम, कुशालसिंह रजपूत, राजू किल्लेदार, सदाशिव टोपाजी, सुनिल बरगे, अनिल बरगे, मुकेश धगुरे, दिपक धुगरे, प्रशांत पसारे, रमेश निकम, अजित चौगुले यांच्यासह अन्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
No comments:
Post a Comment