हणबरवाडी ः येथील मराठी शाळेला सदिच्छा भेटी प्रसंगी प्रितम पाटील, सचिन खोत, मारूती कोळेकर व अन्य
-----------------------------
कोगनोळी, ता. 22 ः कोगनोळी तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील यांनी हणबरवाडी मराठी मुलां-मुलींच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सागर पाटील होते.
स्वागत करून प्रास्ताविकात मुख्याध्यापक डी. एस. नाईक यांनी शाळेत राबविण्यात येत आसलेल्या विविध योजनाची माहिती दिली.
यावेळी प्रितम पाटील यांनी बोलकी शाळा, शाळेचा परिसर, बागेची पहाणी करून समाधान व्यक्त केले. शाळेचे काम चांगले असून सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांसाठी नव-नवीन योजना राबवून शाळेचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, प्राथमिक कृषी पत्तीनचे चेअरमन मारूती कोळेकर, प्रकाश काशिद, दादू खोत, सरदार पोवाडे, अमर खोत, विजय खोत, अमर विटे, प्रशांत पोवाडे आदीसह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------------------------------------
No comments:
Post a Comment