कोगनोळी ः येथील व्याख्यान मालेत बोलताना प्रा. पवनकुमार पाटील
-----------------------------------------------------------
कोगनोळी, ता. 20 ः घ्रातील प्रत्येक व्यक्ती हसत खेळत राहिल्याने सुख व समाधान मिळते. घरांत मुलांच्यावर कोणते संस्कार होणे गरजेचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भोजन व भजन एकत्र होते तेथे संस्कृती नांदते. लोक आपल्या दुखने नाही तर दुसर्याचे सुख बधून दुखी आहेत.
असे विचार प्रा. पवनकुमार पाटील(भोगावती महाविद्यालय, कुरूकली) यांनी केले. कोगनोळी ता. निपाणी येथील समस्त मराठा समाज यांच्यावतिने शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ येथे सुरू आसलेल्या व्याख्यान मालेत शेवटचे पुष्प गुंतताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी मंडळचे अध्यक्ष शामराव माने हे होते.
सुरूवातीला स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे सचिव के. डी. पाटील(सर) यांनी केले. दिपप्रज्वलन व शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पुजन माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील व माजी आमदार काकासो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. पाटील म्हणाले, आता लोकांच्यातील संवाद कमी होत चालले आहेत. बघेल तेव्हा लोक मोबईल मध्ये गुंतला आहे. बोलणे बंद झाल्याने विचाराची देवान घेवान बंद झाले आहे. असे शेवटी प्रा. पाटील म्हणाले.
यावेळी मराठा मंडळचे उपाध्यक्ष उमेश पाटील, नरसिंह पाटील, विजय पाटील, महादेव पाटील, बाळासाहेब पाटील, केशव पाटील, रामचंद्र कागले, दगडू नाईक, संजय डूम, शिवाजी पाटील, प्रकाश गायकवाड, सचिन खोत, रामचंद्र डोंगळे, रावसाहेब पाटील, रावसाहेब चौगुले यांच्यासह विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन करून आभार प्रकाश कदम यांनी मानले.
----------------------------
No comments:
Post a Comment