शिरोली/ प्रतिनिधी
अवधूत मुसळे
देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व शिवसेनेच्या वतीने नऊ दिवस दुर्गामाता दौडचे मौजे वडगावमध्ये आयोजन करण्यात आले.या दौडमध्ये गावातील युवा तरूणांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी साडेपाच वाजल्यापासून कार्यकर्ते महादेव मंदिर येथे जमा होतात . त्या ठिकाणी प्रेरणा मंत्र घेऊन दौडला सुरुवात होते . तसेच या दौडमध्ये देशभक्तीपर गीत , छ . शिवाजीराजे , धर्मवीर संभाजीराजे यांच्यावर अधारीत गितांसह , जय भवानी ' जय शिवाजी ' दुर्गामाता की जय ' आंबा माता की जय ' अशा विविध घोषणां देऊन छ . शिवाजी महाराजांचा व शूर मराठयांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचे काम या दौडच्या माध्यमातून केले जाते . ज्या -ज्या भागात हि दुर्गामाता दौड जाते त्या भागातील महिला व माता भागिनी रांगोळी काढून या दौडचे स्वागत करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग सहभागी झाले होते. दौडचे विसर्जन मारूती मंदिर झेंडा चौक होते.
विजय शेंडगे , सुरेश कांबरे , अवधूत मुसळे ,महादेव चौगुले , महादेव शिंदे , स्वप्निल चौगुले , अविनाश पाटील , नेताजी कांबरे निवास शेंडगे , गणेश मोरे , तेजस लोहार , सनी चौगुले , श्रवण चौगुले , यांच्यासह शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दौडचे नियोजन केले जाते.
फोटो
मौजे वडगाव येथे दुर्गामाता दौड साठी जमलेले कार्यकर्ते
No comments:
Post a Comment