शिरोली/ प्रतिनिधी
अवधूत मुसळे
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी कुंभार यांनी विद्यार्थ्यासाठी बालचित्रपट, अभ्यासिका, ग्रंथालय आदी नवोपक्रम सुरू करून जिल्हयात आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांसाठी अविरत धडपडणारा एक कृतिशील मुख्याध्यापक अशी त्यांची ओळख आहे.
मुख्याध्यापक कुंभार म्हणाले की , माझ्या ३५ वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत अनेक विद्यार्थी वकील , डॉकटर , इंजिनिअर, तसेच अधिकारी बनले असून या गावातीलही काही विद्यार्थी चांगले अधिकारी घडावेत यासाठी कल्पनेतून मी शाळेसाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर या नावाने अभ्यासिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने बाल वाचनालयाची सुरुवात करत आहे तसेच वाचनालयासाठी सध्या १००० पुस्तके उपलब्ध केली असून शाळेमध्ये अभ्यासक्रमातील काही गोष्टी , धडे , यावर आधारीत प्रोजेक्टरद्वारे दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बाल फिल्म म्हणून दाखविले जातात. वाचनालय व अभ्यासिका असे वेगळे उपक्रम शाळेसाठी राबविणारी जिल्हातील पहिलीच प्राथमिक शाळा आहे.
यावेळी सुत्य उपक्रम पित्यार्थ आनंदाने शाळेतील सर्व विदयार्थांना लाडुचे वाटप करण्यात आले . ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे , अविनाश पाटील , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी आकवाटे , प्रकाश कांबरे यांनी आपली मनोगते व्यक्त करून मुख्याध्यापकानां नवोपक्रमा बददल शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी निवास शेंडगे , रघूनाथ कुंभार , पाडळकर , नदाफ मॅडम , पाटील , आककाताई कांबरे , राबिया नगारजी . यांच्यासह शिक्षक पालकवर्ग विद्यार्थी हजर होते . स्वागत व प्रास्ताविक योगेश पाकले यांनी केले तर आभार देवदत्त कुंभार यांनी मानले '
फोटो
मुख्याध्यापक तानाजी कुंभार यांचा सत्कार करनांना अवधूत मुसळे , निवास शेंडगे , सुरेश कांबरे ' व इतर मान्यवर
No comments:
Post a Comment