पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा यांच्या वतीने 'ही दिवाळी स्वराज्याच्या गडकोटांसोबत' या उपक्रमाअंतर्गत किल्ले पन्हाळगडाच्या पदभ्रमंती चे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे .
इतिहासात प्रथमच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या राजमार्गावरून या सफरीची सुरुवात होणार आहे . या मध्ये पन्हाळ्याचा दुर्लक्षित भाग ,गडाच्या वाटा - चोरवाटा , व्यापारी मार्ग , फरसबंदी मार्ग ,दुर्लक्षित समाध्या ,येथे घडलेल्या लढायांची भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने मांडणी पन्हाळ्यावर अभ्यास करणारे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे करणार आहेत . त्याचबरोबर या पदभ्रमंती मध्ये इतिहास अभ्यासक श्री. सतीश वाकसे यांचे "स्वराज्याचे साक्षीदार उपेक्षित नरवीरांचा इतिहास" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .
या भटकंतीची सुरुवात शिवा काशीद समाधी स्थळापासून होणार असून रेडिघाटी , ब्रिटिशकालीन स्मशानभूमी परिसर ,काली बुरुज , राणमंडळ , अंधारबाव ,कोकण दरवाजा , अंबरखाना मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या अवशेषांच्या जवळ सांगता होणार आहे . या मोहिमेत चहा ,जेवण (झुणका भाकरी) व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून 7 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे . नावनोंदणीचे अर्ज सह्याद्रीसाहित्ययात्रा ,भवानी मंडप येथे पवन निपाणीकर व बिंदू चौक येथे प्रशांत आंबी यांच्याकडे उपलब्ध आहेत . अधिक माहितीसाठी 7350407969 या क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन या मोहिमेचे संयोजक सुदर्शन पांढरे व प्रशांत आंबी यांनी केले .
पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ ,
No comments:
Post a Comment