माजगांव प्रतिनिधी.
दि.०६/११/२०१८.
'तिमिरातूनी तेजाकडे' हे व्रत घेवून शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर ता.शाहुवाडी.च्या वतीने विविध दात्यांच्या सहकार्यातून यंदाची दिवाळी धोंडेवाडी(सोनुर्ले)ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर व नांदारी धनगरवाडा ता. शाहुवाडी.जि.कोल्हापूर.या दुर्गम,डोंगराळ, दुर्लक्षित,वाड्या—वस्त्यावरील,पालांवरील लोकांसोबत दिवाळी साजरी केली. गावातील सर्व कुटुंबांना दिवाळी किट दिले.पावनखिंड युवा मंचचे अध्यक्ष अनिकेत हिरवे यांनी सी.पी.एल.फौडेशन पुणे यांच्या सहकार्याने अनेक वर्षे अंधारात राहिलेल्या कुटुंबांना उजेडात आणले.लख्ख प्रकाशात आनंदमय दिवाळी साजरी करताना लोकांच्या चेहर्यावर वेगळेच तेज तरळत होते.लोकांच्या चेहर्यावरील तेज पाहून कार्यकर्त्यांच्या चेहर्यावरील आनंद हा अवर्णनिय व अमुल्य असाच होता.
गेलेदोन दिवस घरची दिवाळी,घरात जमलेले नातेवाईक व घरांतील लोकांच्यामध्ये वेळ न घालवता शैक्षणिक व्यासपिठाच्या आनंदमय दिवाळी या उपक्रमात सर्व कार्यकर्ते सहभागी झाले.खर्या अर्थाने देण्याचा आनंद उपभोगणार्या सर्व दात्यांचे व या कामी अठवडाभर फराळ साहित्य पॅकिंग करुन ते वाडी—वस्तीवरील कुटुंबांना वाटप करणेपर्यत योगदान देणारे व्यासपिठाचे सर्व कार्यकर्ते....राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक हिरवे सर व कुटुंबीय,उमेद फौडेशनचे प्रकाश गाताडे,सचिन कुंभार,सोनुर्ले केंद्रातील शिक्षक परिवार,सुशांत कुंभार,संतोष शेलार,भुसावळ येथे कार्यरत असणारे माने साहेब,दत्तात्रय सोनटक्के,अशोक माने,तुकाराम पाटील,अनिल अंगठेकर,सागर वरपे,सर्जेराव पाटील,संभाजी सुतार,अजित बंगे,सरदार कुंभार,सर्जेराव लोहार,सुनिल सुतार,रामचंद्र बोरगे,चंद्रकांत मुगडे,युवराज काटकर,अशोक पाटील व शिवाजी माने या सोनुर्ले केंद्रातील मावळ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment