Wednesday, 21 November 2018

मंगळवार दि. २७ नोव्हेंबरला पाच जिल्हयातील शाळा बंद राहणार . कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था बैठकीत निर्णय




कोल्हापूर / प्रतिनिधी 

      मिलींद बारवडे

      

       शिक्षक भरतीसाठी आणलेल्या पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करणे   ,वेतनेतर अनुदान सरसकट सर्व शाळांना मिळावे  , शिक्षकेतर सेवक  आकृतीबंध त्वरित लागू करावा, जुनी पेन्शन योजना त्वरीत  लागू करावी   आदी मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांमधील सर्व माध्यमांच्या प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंगळवार  दि. २७  नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय़ आज कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था व  जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या  राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला .अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी. लाड  होते .

         यावेळी बोलताना एस डी लाड म्हणाले , २०  टक्के अनुदानावरील शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे मिळावेत, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी दि .२७ रोजी दसरा चौकातून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे .  शिक्षण क्षेत्रातील समस्या महाराष्ट्र शासनाने त्वरित सोडवाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरले .कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह, सांगली ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व शाळा दि .२७ रोजी  बंद राहतील  .या बैठकीस विभागीय अध्यक्ष शिवाजीराव माळकर ,वसंतराव  देशमुख, प्रा.जयंत आसगांवकर, डॉ.ए.एम.पाटील,आर.डी. पाटील, पी.एस. हेरवाडे, के.एच. भोकरे, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट, बी.जी. बोराडे ,बी.बी. पाटील, प्रतापराव देशमुख, शिवाजी माळकर, संजय पाटील, संजय कडगावे, एम.एन. पाटील, संदीप पाटील , प्रा. समीर घोरपडे , गजानन काटकर आदी उपस्थित होते .आभार प्रा.सी.एम. गायकवाड यांनी मानले.

              फोटो 

कोल्हापूर :  शैक्षणिक व्यासपिठाच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष एस.डी. लाड सोबत जयंत आसगांवकर , शिवाजीराव माळकर ,जयंत आसगांवर, जयवंत  देशमुख व इतर

No comments:

Post a Comment