सेनापती कापशी/ विजय मेस्त्री
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती(पंरपरेने) सेनापती कापशी (ता .कागल) सह संपूर्ण परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सेनापती कापशी ही ऐतिहासिक व सरनौबत म्हाळोजी घोरपडे, सरसेनापती संताजीराजे घोरपडे, हुतात्मा करविरय्या स्वामी, हुतात्मा शंकरराव इंगळे, शहीद जवान सुभाष भोळे, महादेव तोरस्कर, धोंडीराम वेटाळे, वसंत जगदाळे, साताप्पा पाटील अशा वीरांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी.येथील ऐतिहासिक स्वामी चौकात श्रीराजा शिवछत्रपती ग्रुप आयोजित संयुक्तिक शिवजयंती साजरी करण्यातआली.
सकाळी ९ वा.किल्ले भुदरगड येथून शिवज्योतीचे कापशी नगरीत मोठ्या जल्लोषात आगमन झाले .१० वा. महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम, ११ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पाळणा गीते झाली. सायंकाळी ४ वा. कापशीतील मुख्य मार्गावरून मूर्तीची ढोल ताशाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात व आतषबाजीच्या झगमगाटात रथातून भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी शिवमावळयांनी हातात भगवे झेंडे घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी,जय शिवाजी ,धर्मवीर संभाजी महाराज की जय,हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी बाल चमूंसह तरूणांनी पारंपारीक पोषाख परिधान केला होता.
मंगळवार दि.७ रोजी सायंकाळी चिकोत्रा नदी घाट येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापशीतील श्री राजा शिवछत्रपती ग्रुप, सेनापती कापशीकर ग्रुप , नवयुग तरूण मंडळ,शिवप्रतिष्ठाण, अष्टविनायक तरूण मंडळ,,श्री सिद्धिविनायक तरूण मंडळ,श्री गणश्री युवा मंडळ, क्रांती तरूण मंडळ ,मोरया तरूण मंडळ, विरात्मज तरूण मंडळ, चिकोत्रा तरूण मंडळ, , जनसेवा मित्रमंडळ , शहामदार तरूण मंडळ व श्री गणेश तरूण मंडळ या तरूण मित्र मंडळांबरोबरच गावातील बाल व अबालवृद्धांचाही सहभाग मोठा होता.
No comments:
Post a Comment