कोल्हापूर (प्रतिनिधी): महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची निव्वळ घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून ९० ते ९५ टक्के शेतकरी वंचित राहणार आहेत. पात्र शेतकरीही या लाभापासून वंचित राहणार आहेत. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार नाही. कोणतीही अट, निकष न लावता सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मंगळवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हातील २० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. राज्यातील हा पहिला मोर्चा असून त्याची सुरवात कोल्हापूरातून केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment