कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
दि. 24 जानेवारी 2020
कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम व सुव्यवस्थित करण्यासाठी वाहतूक नियंत्रण आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे
याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेसाठी रुपये १.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
कोल्हापूर शहरातील वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहराच्या अनेक प्रमुख ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रण यंत्रणा आधुनिकीकरण निर्णय झाला यामध्ये, नवीन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविणे, जुनी ट्रॅफिक यंत्रणा दुरुस्तीबरोबरच सिंक्रोनायझेशन करणे, सौर उर्जेवर चालणारी ६० ब्लिंकर्स बसविणे, आवश्यक वाहतूक नियमांचे साईन बोर्ड्स, रोड मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग आदी कामांचा समावेश आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
नवीन ट्राफिक सिग्नल्स बसविण्यात येणारी ठिकाणे
- मुक्त सैनिक वसाहत चौक
- दसरा चौक
- माधुरी बेकरी चौक
- बागल चौक
- शेंडा पार्क चौक
- साई मंदिर चौक
- चिवा बाझार चौक
सिंक्रोनायझेशन करण्यात येणारी ट्रॅफिक सिग्नल्स
- उमा टॉकीज चौक
- पार्वती टॉकीज चौक
- बागल चौक
- जनता बाझार चौक
- टाकाळा चौक
No comments:
Post a Comment