माजगाव प्रतिनिधी. बाजीराव कदम.
श्री वीरशैव को-ऑप. बँक लि., कोल्हापूर बँकेने कोरोना संसर्ग च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना संचारबंदीच्या काळात गावातून बाहेर पडता येत नाही.परिणामी बँकेत पैसे आहेत पण काढता येत नाही अशी विचित्र अवस्था लोकांची झाली आहे. लोकांची ही समस्या ओळखून बँकेचे अध्यक्ष महादेव साखरे,उपाध्यक्ष राजेंद्र लकडे,संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर, डी. जे.एम.राजेंद्र कोरे यांच्या सहकार्यातून या संचारबंदीच्या काळामध्ये बँकेच्या ए.टी.एम.व्हॅनव्दारे आपल्या गावामध्ये कोणत्याही बँकेच्या खात्यातील रोख रक्कम काढण्याची सोय करून दिली आहे.ही ए.टी.एम. व्हॅन दिनांक 28/4/2020 रोजी दुपारी 3 ते 4 वेळेत माजगाव येथे उपलब्ध होणार आहे तरी माजगाव पंचक्रोशीतील माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी व देवठाणे गावातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघर्ष क्रिडा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश चौगले व महेश कवचाळे यांनी केले आहे.
यावेळी बँकेचे प्रतिनिधींनी सांगितले की,हा उपक्रम खर्चिक असूनही या संचारबंदीच्या काळातही खेड्यातील लोकांची पैशाची चनचन दूर व्हावी या सामाजिक बंधीलकीतून गेली दहा दिवस सुरु केला आहे.या उपक्रमाचा आतापर्यंत जवळ जवळ सहाशे लोकांना फायदा झाला आहे.
No comments:
Post a Comment