▼
Monday, 27 April 2020
कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवला खास काढा
प्रतिनिधी - सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वजण धास्तावले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही रोगाशी सामना करु शकतो. हीच गोष्ट लक्षात घेेऊन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना विषाणूंचा विरोधात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खास हर्बल काढा सुचवला आहे. यासाठी देशातील मान्यवर आयुर्वेदाचार्यांची मदत घेण्यात आली. आपण आपल्या घरीही हा काढा करु शकतो. तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळी मिरी आणि मनुका या पाण्यात टाकुन उकळून त्यांचा काढा तयार करावा. हा काढा कोणत्याही श्वसन विकारांवर अत्यंत उपयुक्त आणि प्राचीन काळापासून चालत आलेला शास्त्रोक्त उपाय मानला जातो. आयुष मंत्रालयाने काही आयुर्वेदिक कंपन्यांना असा काढा तयार करुन औषध बाजारात त्वरित उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच श्वसन विकारांवर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अशी आयुष मंत्रालय सुचित औषधे बाजारात उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच हळद आणि गरम दुध तसेच नियमित च्ययवनप्राश चे सेवन करणे हे सुद्धा उपाय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुचवले आहेत. पण याबरोबरच कोरोना विषाणूंवर हे औषध म्हणून वापरणे किंवा अशी जाहिरात करणे याला प्रतिबंध असल्याचे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे.
No comments:
Post a Comment