Tuesday, 21 April 2020

गरीब गरजूंना धान्य जीवनावश्यक वस्तू वाटप - सनी नरके फाउंडेशनचा उपक्रम

  प्रतिनिधी विजय हंचनाळे                                 कोरोना विषाणूंचा फैलाव देशामध्ये होत असताना शासनाने संचार बंदी केली व  लाॅकडाऊनच्या काळात सामान्य जनता ज्याच हातावरील पोट आहे अशांचे जगणंच मुश्किल झाले आहे. अशा गरीब व गरजु व्यक्तींसाठी  सनी नरके फाउंडेशनच्या वतीने ना. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोजच्या जीवनात  लागणरे आठ दिवस पुरेल असे धान्य किट (जीवनावश्यक) वस्तु वडकशिवाले, खेबवडे,  दिंडनेर्ली,  नंदगाव, नागाव, ईस्पुर्ली, चुये, कावणे येथे वितरित करण्यात आले. यावेळी कृष्णात पाटील मा सरपंच,अमर पारळे मा.सरपंच, जयप्रकाश पाटील, विजय वंडिगेकर, गणेश मेटील, कुमार मेटील, उत्तम पाटील, एस बी पाटील, महेश परिट, जिवन पाटील, रंगराव पाटील, महेश नरके, अमोल साठे आदी गावातील तसेच भागातील सनी नरके फाउंडेशनची टीम उपस्थित होती.


No comments:

Post a Comment