कोरोना च्या काळातही महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नि गवे खालसा मधील विद्युत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण
निगवे खालसा - प्रतिनिधी. वादळी वारे विजेच्या गडगडांसह काल झालेल्या जोराच्या पावसाने निगवे खालसा गावातील विद्युत पुरवठा विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्याने खंडीत झाला होता. त्यामुळे निगवे खालसा गाव अंधारात बुडाला होता खंडीत विद्युत पुरवठ्याने ग्रामस्थ रात्रभर हैराण झाले होते. पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर या कठीण काळातही महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर कार्य करून नवीन विद्युत चा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम आठ तासात पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने गावात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त असताना देखील वितरणच्या बापट कॅम्प कोल्हापूर येथील कार्यालयात जावून नवीन ट्रान्सफॉर्मर आणून तो बसविण्याची कामगिरी बाचणी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असणारे शाखा अभियंता सुशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लाईन मन राजू चव्हाण, वायरमन युवराज चौगले, सुभाष सूर्यवंशी, गोरख पाटील, राहुल गुरव, भरत पाटील, प्रकाश चौगले यांनी सोशल डीस्टन्स ठेवत सलग ८ तास अखंड मेहनत घेऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले. ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर हुन आणण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था माजी उपसरपंच तरुण तडफदार कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य अशोक किल्लेदार यांनी केले. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांच्या अंखंड दिवसभराच्या अथक व सांघिक प्रयत्नामुळे ८ तासानंतर सायंकाळी सहा वाजता गाव पुन्हा उजळून निघाले प्रकाशमय झाले.
No comments:
Post a Comment