Tuesday, 28 April 2020

परदेशातून आलेल्या लोकांचे होम क्वारंटाईन पूर्ण तरीही घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.29/4/20

मिलींद बारवडे
      हातकणंगले तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी  २५ देशातील परदेशातून आलेल्या लोकांचे होम क्वारंटाईन केले होते. त्यामध्ये  ग्रामिणमध्ये ५४ व शहरामध्ये ७२ लोकांचे २८ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७८३१ पैकी चौदा दिवसाचे ७७८९ व अठ्ठावीस दिवसाचे ६७१७ जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.
    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हातकणंगले तालुका समितीचे तहसिलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी अरूण जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या उत्कृष्ट नियोजन व संयोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे. तसेच  त्यांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे.
         कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी हातकणंगले व्यवस्थापन समितीचे गटविकास अधिकारी अरूण जाधव यांनी दिलेल्या एकवीस एप्रिलच्या अहवाल  नुसार पंचवीस देशातील ग्रामीण व शहरी भागात आलेल्या लोकांचे होम क्वारंटाईन १२ मार्चपासून केले त्यांचा २८ दिवसांचा कालावधी संपला त्यामध्ये दुबईतून ग्रामीणमध्ये १२ व शहरामध्ये ३४, अमेरिकेतून ४ ग्रामीण व ५ शहरामध्ये, जॉर्जिया २ ग्रामीण.व शहरामध्ये १, जर्मनी ग्रामीणमध्ये २, कतार ग्रामीणमध्ये ३, कुबेज ग्रामीणमध्ये १, लंडन ग्रामीणमध्ये २ व शहरामध्ये ४, ओमानतून ग्रामीणमध्ये ६, नेपाल ग्रामीणमध्ये ३, सौदी अरेबिया ग्रामीण ५ व शहरामध्ये ९, युएई ८ ग्रामीणमध्ये, दिल्ली शहरामध्ये १, इटली शहरामध्ये १, मॅनमार्क शहरामध्ये १, सिंगापूर शहरामध्ये ४, साऊथ कोरिया शहरामध्ये १, टोकियो ग्रामीणमध्ये १ व शहरामध्ये ४, फिलीफाईन्स ग्रामीणमध्ये १,युके शहरामध्ये १, मस्कत शहरामध्ये १, केनिया ग्रामीणमध्ये २ , भुतान ग्रामीणमध्ये १, मॉरिशियस शहरामध्ये १, आर्यलँड शहरामध्ये १, रशिया ग्रामीणमध्ये १, इस्लामपूर शहरामध्ये १, ऑस्ट्रेलिया शहरामध्ये २ आदी संख्येपैकी ग्रामीणमध्ये ५४ व शहरामध्ये ७२ जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले.
       गावनिहाय्य परदेशी होम क्वारंटाईन ग्रामीण संख्या सावर्डे ४, रुई २, नवे पारगांव ४, कोरोची ४, भादोले २, चंदूर२, माणगांव १, लाटवडे १, किणी ३, रुकडी १,नेज १, मजले १, नागांव १, खोची १, भेंडवडे १ , तासगांव ३, पुलाची शिरोली ६, बु. वाठार १, मिणचे २, कबनुर २, टोप १, आळते २, हातकणंगले ३, प. कोडोली १, खोतवाडी १, हेरले १, हुपरी २ अशी ५४ जणांची संख्या आहे. इचलकरंजी ६४ व पेठवडगांव ८ एकूण ७२ संख्या शहरातील आहे.
        हातकणंगले तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत अठ्ठावीस दिवसाचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेली  संख्या आळते ८५५ पैकी ६५८ , अंबप ८८३ पैकी ७११,भादोले ८९७ पैकी ८७६, हेरले ६८३ पैकी ६०४, हुपरी १०५८ पैकी ७९९, प. कोडोली ८९९पैकी ८६०, पुलाची शिरोली ७२३ पैकी ४९८, साजणी ७२१ पैकी ५८९ , सावर्डे ११३९ पैकी ११२२ असे एकूण ७८३१ पैकी ६७१७ लोकांचे अठ्ठावीस दिवसांचे व ७७८९ जणांचे चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे .

      प्रतिक्रिया
पंचवीस देशातील परदेशातून ग्रामीण भागात ५४ व शहरी भागात ७२ जण आलेल्यांचे अठ्ठावीस दिवस होम क्वारंटाईन  पूर्ण  होऊन ते निरोगी असल्याने कोरोना संसर्गाची भिती दूर झाल्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. तरीही नागरीकांनी स्वतःची काळजी घेऊन घरातच राहून प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.

     गटविकास अधिकारी अरूण जाधव
               हातकणंगले

No comments:

Post a Comment