कंदलगाव . प्रकाश पाटील
दिड महिण्यापासून कोरोना विषाणूंचा प्रसार थांबविणेसाठी शासनाने संचारबंदी लागू केल्याने संपूर्ण गावाची काळजी घेण्यासाठी व आपले गाव सुरक्षित ठेवणेसाठी ग्रामपंचायती मधिल विरोध मावळला असून सध्या या कोरोनाशी लढण्यासाठी सर्व सदस्यांमध्ये एकीचे दर्शन घडत आहे .
जिल्हामध्ये अनेक गावातील ग्रामपंचायतमध्ये शक्यतो दोन गटातील सदस्य आहेतच .एरवी प्रत्येक कामात एकमेकांना विरोध करणारे सदस्य कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गाव सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र येऊन औषध फवारणी , आरोग्य , जनजागृती करुन आपल्या सदस्य पदाची पोचपावती देत आहेत .
गावामध्ये कोरोनाची बाधा येऊ नये यासाठी गावातील शेतीमाल ( भाजीपाला ) गावातच विक्री करून नागरीकांची सुरक्षीतता जपण्यात येत आहे . ग्रामपंचायत कडून वेळोवेळी जनजागृती करून गावकऱ्यांचे आरोग्य जपण्यात येत आहे .
या कोरोना मुळे मात्र गावागावात एकीचे दर्शन घडत असल्याने गावातील विरोध मावळ्याचे नागरीकांतून चर्चा सुरू आहे .
भाजी विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था ...
कंदलगाव ,पाचगाव ,मोरेवाडी या ग्रामपंचायतीनी आपल्या गावामध्ये स्वतंत्र भाजीमंडईची व्यवस्था केली असून सुरक्षीत अंतर ठेऊन तसेच संपूर्ण भाजीमंडईवर लक्ष ठेवणेसाठी कमिटी स्थापन केली असून नागरीकांची गर्दी होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे . यासाठी गावचे सरपंच , उपसरपंच सर्व सदस्य , कर्मचारी , दक्षता समिती , आरोग्य विभाग , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स , तरुण मंडळांचे सहकार्य लाभत आहे .
फोटो - कंदलगाव येथे भाजी मंडईत गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली आहे .
No comments:
Post a Comment